रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणकर चाळ, तसेच जे.के.फाईल्स ते गद्रे कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर,लायन्स क्लब ते एसटी वर्क शॉपकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी केल्या प्रकरणी चार चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.55 ते सायंकाळी 7.20 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
शमशाद अहमद गुलाम हसन हुसेन (34,रा.उत्तरप्रदेश),इराप्पा सिध्दाप्पा बाळगानूर (39,रा.क्रांतीनगर,रत्नागिरी),इरफान सई मोहम्मद शहा (36,रा.एमआयडीसी,रत्नागिरी) आणि जमाल मोहम्मद ताहीर खान (45,रा.एमआयडीसी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयित चालकांची नावे आहेत. यांनी आपल्या ताब्यातील वाहने इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने उभी केली होती. त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









