Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे रस्त्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात; तिघे जखमी

गणपतीपुळे रस्त्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात; तिघे जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. महादेव ज्योतिराम कांबळे (वय ३१) व प्रकाश लाला बनसोडे (वय २६, दोघेही रा. आवे, पंढरपूर जि. सातारा) आणि सहदेव लेट गंभीर जखमींची नावे आहे. ही घटना बुधवारी (ता २७) दुपारी चारच्या सुमारास गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी महादेव कांबळे व प्रकाश बनसोडे हे दोघे दुचाकीवरुन गणपतीपुळे येथील आरेवारे मार्गे रत्नागिरीत येत असताना अभिषेक हॉटेल येथील रस्त्याच्या वळणावर आले असता समोरुन येथे सहदेव लेट व नुतन लेट या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाला. या अपघातामध्ये महादेव, प्रकाश आणि सहदेव हे गंभीर जखमी झाले. तर नूतन लेट या तरुणाला किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.