Thursday, September 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ३० हजार रुपयांच्या ‘गांजा’सह एक जण जेरबंद

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ३० हजार रुपयांच्या ‘गांजा’सह एक जण जेरबंद

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमे अंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिपळूण शहरातील वालोपे परिसरामध्ये रेल्वे स्थानकासमोर छापा टाकून ५३० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. ही धडक कारवाई शुक्रवार, ३१ जुलै रोजी करण्यात आली.

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला व विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक ३१ जुलै रोजी हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) करत होते.

​यादरम्यान, वालोपे येथील रेल्वे स्टेशनसमोरील साई मंदिरा शेजारी एक इसम हातात पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकाने तातडीने दोन पंचांसमक्ष त्या व्यक्तीला थांबवून त्याची चौकशी केली.

चौकशीत त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय ४८, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीची झडती घेतली असता, त्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ५३० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ३०,००० रुपये किमतीचा ‘गांजा’ सदृश अंमली पदार्थ मिळून आला.

​सदर अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या स्वतःच्या ताबा कब्जात बाळगल्याप्रकरणी आरोपी अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२३/२०२६, एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या 

पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, पोलीस हवालदार वृषाल शेटकर, पोलीस हवालदार रोशन पवार, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी (१३१५) यांनी केली.