रत्नागिरी:- मिरजोळे-पाडावेवाडी येथील वृद्ध बाथरुम मध्ये बेशुद्ध पडले उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. काशिनाथ पांडुरंग केळकर (वय ७६, रा. अनुराधा अपार्टमेंट, मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार स्वप्निल दशरथ खेडेकर यांची बहीण आरती संतोष केळकर हिने फोन वरुन मयत सासरे काशिनाथ केळकर हे फोन उचलत नाहीत घरी जावून बघ असे सांगितले. स्वप्निल हे अनुराधा अपार्टमेट मिरजोळे येथे गेले असता दरवाजा बंद होते. बाहेरुन आवाज दिला दरवाजा ठोठवला मात्र प्रतिसाद मिळाला नाही अखेर सोसाटीमधील जमलेल्या लोकांच्या मदतीन दरवाजा तोडून पाहिले असता काशिनाथ खेडेकर हे बाथरुमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









