राजापूर:- झाल्याने तालुक्यातील भू गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अमित सरफरे व अनंत सरफरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्या ग्रामपंचायत कालावधी पूर्ण व ग्रामपंचायतीची निवडणूक न झाल्याने प्रशासक काम कृषी विस्तार अधिकारा पी. व्हाय. सावंत काम पाहत आहेत. तर ग्रामसेवक म्हणून प्रशांत प्रमोद कांबळी हे कार्यरत आहेत. विजय नारायण सरफरे यांनी सरफरेवाडी येथे अनिल यांच्या घर गोठ्याजवळ जाणारे पायवाटेवर गुरे जाण्याची पायवाट सोडून चिरे बांध घातलेला आहे. याच वाटेवरून वाद सुरू आहे. गावातील अमित व विजय सरफरे यांच्यासहीत काही ग्रामस्थाचा बांध घातलेवरून वादविवाद चालू आहे. बांध काढण्याकरीता अमित व ग्रामस्थ १५ रोजी ग्रामपंचायत भू येथे उपोषणकरीता बसणार होते. यामुळे रस्त्याची पाहणी करणेकरीता गटविकास अधिकारी, प्रशासक, ग्रामसेवक व मी वादाबाबत बांधाजवळ गेले असता त्या ‘ठिकाणी अमित व अनिल, विनय, वैभव, अथर्व सरफरे, भावेश सरफरे उपस्थित होते.