Saturday, May 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चारजणांना पाचशे रुपये दंडाची शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चारजणांना पाचशे रुपये दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेल्या 4 आरोपिंना न्यायालयाने 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली

राजेंद्र श्रीधर मयेकर (54, रा. सोमेश्वर सतीचीवाडी, रत्नागिरी), वरद अशोक सोनावले (24. रा. सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी), मयुरेश प्रमोद पारकर (28, रा. तांबटआळी रत्नागिरी), साहिल अब्बास कागवाड (29, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहेत.रानागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शबनम युनुस शेख यांनी हा निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार राजेंद्र मयेकर हा 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शहरातील आयटीआय शेजारील रस्त्याच्या कडेला दारु पिण्यासाठी बसला असल्याचे आढळून आले होते. तर वरद नावले हा 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन स्टॉपच्या मागील बाजुला दारु पिण्यासाठी बसला असल्याचे आढळून आले होते. तसेच मयुरेश पारकर हा 31 डिसेंबर 2024 रोजी प्रमोद महाजन क्रीडा संकूल शेजारी तर साहिल अब्बास कागवाड हा 17 जानेवारी 2026 रोजी पॉलिटेक्निकल महाविद्यालय शेजारील जागेत दारु पिण्यासाठी बसला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपिंविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते. न्यायालयापुढे संशयितांनी आपला गुन्हा कबुल केला. तसेच आपली घरची परिस्थिती गरीब असून आपल्याला कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयापुढे केली होती. त्यानुसार न्यायालयाने चारही संशयितांना 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.