रत्नागिरी:- भाट्ये येथील मुरकरवाडी स्टॉपजवळ अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी रात्री 12 वा.सुमारास करण्यात आली.
मर्जान अब्दुल्ला तांडेल (30,रा.राजीवडा नाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल विक्रम पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शुक्रवारी रात्री ते स्टाफसह शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित हा भाट्ये येथील मुरकरवाडी स्टॉपजवळ असलेल्या स्ट्रिट लाईटखाली अंमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळून आला. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8 (क),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.









