Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पावस येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पावस:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजश्री राजाराम गुरव (वय ६७, रा. गणेशगुळे, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजश्री या सोमवारी (ता. ९) रात्री जेवण करुन झोपण्यासाठी गेल्या असता त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.