दापोली:- तालुक्यात एका 90 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर परप्रांतीय कामगाराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोहन भिल् असे संशयित परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. या नराधमा विरुद्ध दापोली पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून तालुक्यातील हातीप परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत. याप्रकरणी त्या विकृत मनोवृत्ती असलेल्या कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे.