Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजात घरफोडी; फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास

लांजात घरफोडी; फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास

लांजा:- शहरातील माऊली नगर परिसरात एका बंद फ्लॅटमधून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर येथील सी-००५, साई समर्थ माऊली येथे राहणाऱ्या रुही सुयोग तांबा (३७) यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून ते २१ जून रोजी सकाळी ७:४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून ४३ ग्रॅम वजनाचे, एकूण १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच, लांजा पोलिसांनी २१ जून रोजी रात्री ८:५६ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत. बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.