Sunday, September 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन

दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन

खेड:- दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय प्रौढाचा खून करणाऱ्या प्रकाश गंगाराम वाजे (४०, रा. शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) या संशयितास येथील जिल्हा न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला. संशयिताच्या वतीने ॲड. सिद्धी खेडेकर यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

३० जून रोजी पहाटेच्या सुमारास संशयित प्रकाश वाजे याने सदू सखाराम मोकाशी (४२, शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) याचा खून केला होता. हे दोघेही शेनाळे-बर्गेवाडी याठिकाणी असलेल्या काताच्या फॅक्टरीत काम करत होते. पेग भरण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.