Thursday, July 9, 2026
spot_img
Home दापोली दापोलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दापोलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवर ६ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बासीद अल्ली दरबार बरमारे (वय ३२, रा. आडे वरचा मोहल्ला, ता. दापोली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हॉटेल रेंझींटा जवळील रोडवर हा अपघात घडला. 

आंजर्लेकडून येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक MH 08 W 9013) चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने,हयगयीने आणि अविचाराने चालवत असताना हर्णेकडून आंजर्लेकडे जाणाऱ्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीला (क्रमांक MH 08 AV 4714) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार बासीद बरमारे खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची फिर्याद पोलीस पाटील अवनी अनंत चौधरी यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दापोली पोलिसांनी टेम्पो चालक गंगाराम रामु माने (वय ५५, रा. नवानगर, ता. दापोली) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करत आहेत.