Monday, May 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी तलवारीने ठार मारण्याची धमकी ; दोघांविरुद्ध गुन्हा

तलवारीने ठार मारण्याची धमकी ; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- ‘बंटी तू तलावर घेऊन ये, याला मी ठार मारतो’ अशी धमकी व मारहाण करुन दुखापत करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज गणपत कीर व मनोज कीर यांचा चालक (नाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास भैरी मंदिराचे पाठीमागे मुरुगवाडा येथील रस्त्याचे बाजूला घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ईशान दिपक नागवेकर (वय ३५) हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो (क्र. एमएछ-०८ एएच १९७१) ही त्यांचा चालक तानाजी माने यांच्याकरवी भैरी मंदिराच्या पाठीमागे मुरुगवाडा येथे नियमित गाडी पार्किंग करुन ठेवत असतात. मात्र मंगळवारी संशयित मनोज किर याने येथे गाडी पार्किंग करायची नाही असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी सांगितले की मी इथला स्थानिक गावातील आहे. मी रोज टेम्पो येथेच लावतो. याचा राग संशयिताला आल्याने त्याने फिर्यादी ईशान नागवेकर या तरुणाची गळा आवळला व संशयित चालक याने दगड उचलून फिर्यादी ईशान यांच्या कपाळावर मारला तो त्यांच्या भुवईवर लागून दुखापत झाली. त्यानंतर संशयित मनोज याने बंटी तू तलवार घेऊन ये याला मी ठार मारतो अशी धमकी दिली. या प्रकरणी ईशान नागवेकर याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.