Wednesday, May 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जयगड येथे मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

जयगड येथे मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील पाण्याच्या टाकीजवळ मद्यपान करणाऱ्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर आडाव (वय ४८, रा. मारुतीमंदिर जवळ संदखोल, जयगड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना जयगड ते खंडाळा जाणाऱ्या रस्त्यावर जयगड येथील पाण्याच्या टाकीजवळ निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित प्रशांत आडाव हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल पवन पांगरीकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.