Thursday, October 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताला हत्यारांसह अटक

चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयिताला हत्यारांसह अटक

संगमेश्वर:- संगमेश्वर एस.टी. स्टँड परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. संतोष चंद्रकांत राणे (वय ४९, रा. दामूनगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे , मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०२ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एस.टी. स्टँड परिसरातील एका टपरीच्या आडोशाला एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी त्याची पाहणी व चौकशी केली असता, आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरीसाठी लागणारी विविध हत्यारे जवळ बाळगून असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार योगेश दशरथ शेटये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष राणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम गुन्हा नोंदवण्यात आला आहे.