Monday, July 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चाकूच्या धाकाने लुटणारे दोघे पोलीस कोठडीत

चाकूच्या धाकाने लुटणारे दोघे पोलीस कोठडीत

खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील प्रकार

खेड:- खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटात चाकूचा धाक दाखवत एकास लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या शाहरूख युसुफमिया कुरुपकर (३१, रा. रूखी-दापोली), फाईज अकबर हुसेनी (२८, मुंबके-अंतुले मोहल्ला, खेड) यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ५ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यातील सार्थक खेडेकर (महाडनाका) हा पसार आहे. संशयितांनी लुटीसाठी वापरलेली वॅगनार कारही शनिवारी जप्त केली. रोहन राजू तांबे (३०, रा.शिव खुर्द- बौद्धवाडीनं. १, सध्या नगरपरिषदवसाहत खेड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते दापोलीहून खेडला येण्यासाठी दापोली बसस्थानकाच्या

बाहेर खासगी वाहनाची वाट पहात असताना अचानक एक चारचाकी वें गनार कार त्यांच्यासमोर उभी राहिली. खेडला येणार का, असे विचारल्यानंतर होकार दर्शवत ते कारमध्ये बसले. कुंभवेनजीक आले असता कार थांबवत संशयितांनी फिर्यादीच्या पोटावर चाकू लावत खून करण्याची धमकी दिली. याचवेळी संशयितांनी फिर्यादीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओही बनवला. साखरोली येथील पेटोल पंपाजवळ कार आली असता संशयितांनी फिर्यादीच्या गुगल पे वरून फोन पे वरील स्कॅनरवर सर्वप्रथम २०० रुपये घेतले. त्यानंतर १००० रुपये घेत पुन्हा मोबाईल घेवून गुगल पे वरून फोन पे वरील स्कॅनरवर स्कॅन करून ५ हजार रुपये घेतले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे करत आहेत.