गुहागर:- रत्नागिरीत सलग दोन घटना घडल्यानंतर आता गुहागरातही तशाच मुलं बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. दोन वेगवेगळया गावातील एक अल्पवयीन मुलगा आणि एक सज्ञान मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सज्ञान मुलगी ही शनिवार 30 जुलैपासून बेपत्ता आहे. या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
गुहागर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगा शनिवारी सकाळी रामपूर येथून शाळेत जाण्यज्ञासाठी घरातून निघून गेला. मात्र सायंकाळपर्यंत घरी न परल्याने त्याचा शोधाशोध सुरु झाला. तो दुसर्या दिवशीही शाळेत न गेल्यामुळे पालकांना चिंता लागल्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या मुलाच्या बेपत्ताची माहिती सोशल मिडियावर टाकण्यात आली. त्यानंतर एका शहरात हा मुलगा असल्याचे कळले. तातडीने ही माहिती पोलीसांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. एक पोलीस पथक संबंधित शहराकडे रवाना झाले आहे.
तर दुसऱ्या घटनेत शनिवारी एक सज्ञान व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. ही मुलगी सज्ञान आहे. ती एकटीच बेपत्ता झाली. पोलीस तिचा शोध घेत आहेत.









