Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुहागर गुहागरमध्ये टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

गुहागरमध्ये टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील असगोली येथील एका ३९ वर्षीय तरुणाचा टेरेसवरून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. गौरव अरुण पवार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पवार १८ मे रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरून खाली पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात हलवण्यात आले.
अपरांत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, ३० मे रोजी सायंकाळी ५:५० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.