Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुहागर तवसाळ येथे डिझेल टँकर उलटून अपघात; एकाचा मृत्यू

तवसाळ येथे डिझेल टँकर उलटून अपघात; एकाचा मृत्यू

चौघे जखमी

गुहागर:- गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे बुधवारी दुपारी एका डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चौौौघे जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास आबलोली-तवसाळ रोडवर अशोका बिल्डकॉन कंपनीजवळ हा अपघात घडला. महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप डिझेल टँकर (क्रमांक: RJ 47 GA 8386) तवसाळच्या दिशेने जात होता. तवसाळ गावातील कंपनीपासून १०० मीटर अंतरावर असताना, चालक मेहेरतेज दिवाकर गुडेला (वय ३५, रा. विरार) याने गाडी भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवली. अचानक स्टेरिंग डाव्या बाजूला फिरवल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी झाला.
​जीवितहानी आणि जखमींचा तपशील
​या अपघातात टँकरमधील सुनील संतराम वर्मा (वय २५, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. तसेच फिर्यादी रवींद्र जयंतीलाल यादव (वय २७) यांच्यासह रवींद्र जयंतीलाल यादव (वय ३५), तलत अहमद नर खान (वय ३०), उपेंद्र श्रीकृष्णानंद यादव (वय २०), मेहेरतेज दिवाकर गुडेला (चालक) हे चारजण् जखमी झाले आहे.

​हे सर्वजण सध्या तवसाळ येथील अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.

​याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवींद्र यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक मेहेरतेज गुडेला याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.