Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड खेडमध्ये झाडावरून पडून महिलेचा मृत्यू

खेडमध्ये झाडावरून पडून महिलेचा मृत्यू

खेड:- झाडावरून पडल्याने डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. २१ मे रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती कृष्णा जाधव (वय ३५, रा. तिसंगी, पिंपळवाडी, ता. खेड, सध्या मदन भोसले यांच्याकडे भाड्याने) या झाडावरून पडल्याने त्यांना डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांना तात्काळ कळंबोळी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कळंबोळी येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना १०८ ॲम्ब्युलन्सने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. रात्री १०.१५ वाजता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी, डॉ. स्वराज धारगळकर यांनी तपासणी केली असता, भारती जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेमुळे खेड तालुक्यातील तिसंगी पिंपळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.