खेड येथे घरफोडी; २ लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास

आठ महिन्यांनी गुन्हा दाखल

खेड:- कुरवळ गावठाण, खेड येथे हरिश्चंद्र बापू उतेकर यांच्या राहत्या घरात १ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ७ ते २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली.

घराच्या मागील दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि पोटमाळ्यावरील पत्र्याच्या पेटीतून २,३०,१३०/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याचा हार, मंगळसूत्र, बाळी आणि चांदीची साखळी यांचा समावेश आहे.

याप्रकरणी ११ जुलै २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा (गु.र.नं. २२२/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.