Thursday, September 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुम मधून २५ हजारांची चोरी

रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुम मधून २५ हजारांची चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी रल्वे स्टेशन येथील एसी वेटींग रुम मधून रिसेप्शनसच्या टेबल मधील २५ हजाराची रक्कमेचा डबा अज्ञात चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथील एसी वेटींग रुममध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेटींग रुम मधील कर्मचारी फिर्यादी सदफ फकीर मोहम्मद शेख (३८,रा. मिरजोळे पाडावेवाडी,रत्नागिरी) हे रेल्वेस्टेशन येथील एसी वेटींग रुम येथे नोकरीला आहेत. शुक्रवारी सकाळी ते आपल्या ड्युटीवर हजर असताना त्यांना तेथील रिसेप्शन टेबल मधील रोख २५ हजार रुपये असलेला डबा चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आजुबाजुला पैशांच्या डब्याचा शोध घेतला परंतू तो मिळून न आल्याने त्यांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.