क्रेडिट कार्डचा वापर करुन ८७ हजाराची ऑनलाइन फसवणूक 

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील टीआरपी येथील एका दुचाकी कंपनीच्या कर्मचाऱ्याला इशुरन्सबाबत विचारणा करुन व्हॉटसॲपवर पाठवलेली लिंक भरुन घेऊन त्याच्या क्रेडिट कार्ड वरुन ८७ हजार ६४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ फेंब्रुवारी ला दुपारी साडेबारा ते सव्वा च्या सुमारास टिआरपी येथील यामाहा शोरुम येथे मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद रघुनाथ यादव (वय ३१,रा. सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर, नाचणे, रत्नागिरी) यांच्या नोकरीच्या अनुषंगाने ते शोरुमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर संशयिताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन प्रसाद यांच्या एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स बाबत विचारणा केली. इन्शुरन्स (विमा) डिॲक्टीवह रण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली त्याने प्रसाद याच्या व्हॉटसअॅपवर लिंक पाठवून ॲप मध्ये वैयक्तीक माहिती भरुन घेतली व प्रसाद यांच्या क्रेडीट कार्ड वरुन ८७ हजार ६४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी प्रसाद यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.