Sunday, May 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली वकील महिलेची 53 हजारांची फसवणूक

ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली वकील महिलेची 53 हजारांची फसवणूक

रत्‍नागिरी:- ऑनलाईन क्लासेसच्या नावावर वकिल महिलेची तब्बल 53 हजार 563 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 8 जानेवारी ते 8 मे 2026 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी विकास जाडान या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याच्या विरोधात ॲड.प्रगती प्रमोद पाटील (38, रा.बालाजी एलिजन्स जेलरोड,रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, जानेवारी 2026 मध्ये फिर्यादी या आपल्या घरी असताना युट्युब या सोशल मिडियावर त्‍यांनी प्लॅनेट स्पार्क क्लासेसची जाहिरात पाहिली. त्‍यांनी विकास जाडान या संशयिताशी फोनवर संपर्क साधला असता त्‍याने दोन वर्षांच्या कोर्सची माहिती देत 53 हजार 563 रुपये फि असल्याचे सांगितले. त्‍याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फी भरली. परंतू त्‍यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्‍यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.