Sunday, November 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी स्विफ्ट कारच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

स्विफ्ट कारच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

दापोली-कुंभवे मार्गावरील घटना, वाहनचालकावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील कुंभवे मार्गावर पायी चालत जाणाऱ्या सुरेश सखाराम पवार (६०) यांना खेडकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता पाठीमागून धडक दिली. यात ते जखमी झाल्याने रत्नागिरी येथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वाहनचालक अनंत अशोक पांचाळ (२१, नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद वसंत सखाराम कोळंबे (५०, कुंभवे शिगवणवाडी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वसंत कोळंबे व सुरेश सखाराम पवार हे दोघे शुक्रवारी रात्री कुंभवे गावच्या देवळात देवाच्या संदर्भात होणाऱ्या सभेसाठी पायी चालत जात होते. याचवेळी
रात्री ९.१५ वाजण्याच्या दरम्यान खेड बाजूने दापोलीकडे येणाऱ्या अनंत अशोक पांचाळ ताब्यातील स्विफ्ट कारने (एमएच १४ केए ७९६२) कोळंबे व पवार यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. हे दोघे या धडकेने रस्त्याच्या डाव्याबाजूला पडले असता कोळंबे यांच्या कमरेला मुका मार लागला तर पवार यांच्या डोक्याला व पाठीला मारला लागला त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रत्नागिरी रुग्णालयात देखिल करण्यात आले. मात्र त्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर माणुसकी दाखवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी आणि पोलिसांना माहिती देण्याऐवजी आरोपी आनंद पांचाळ याने आपल्या कारसह दापोलीच्या दिशेने पळ काढला.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र तुकाराम नलवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३३ वाजता आरोपी आनंद पांचाळ याच्याविरोधात गुन्हा (गु.र.नं. २४६/२०२६) नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १३४(अ) आणि १३४(ब) अन्वये कारवाई केली आहे. दापोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.