लांजा पोलीस ठाण्यात नोंद
लांजा:- लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दारूच्या नशेत विहिरीच्या पाण्यात पडून आसगे येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८, रा. आसगे मांडवकरवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे दारूच्या नशेत विहिरीच्या पाण्यात पडले. पाण्यात पडल्याने त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाति ५.१८ वाजता लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.









