Sunday, September 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या 2 तरुणांविरुद्ध गुन्हा

मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या 2 तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील अमोल खडसोडे (रा. झारणी रोड, रत्नागिरी) व ऋषीकेश प्रकाश सुवरे (वय २४, रा. वरचा फगरवठार, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. २) सव्वा आठच्या सुमारास मांडवी येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दोघेही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस शिपाई अमित पालवे व पोलिस कॉन्स्टेबल निलेश शिंगवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.