Monday, October 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी चंपक मैदान येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

चंपक मैदान येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या उद्यमनगर, चंपक मैदान येथील सार्वजिनक ठिकाण मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. आसिफ अयुब मुरशेद (वय २६, रा. मुळ विनायकनगर, एमआयडीसी सोलापूर कुंभारी. सध्या परटवणे झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) रात्री पावणेनऊच्या सुमारास चंपक मैदान येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत बंडबे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.