Thursday, August 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या ६५ वर्षीय कैद्याचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दीपक गौराजी गमरे (वय ६५, रा. कळकवणे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत बंदीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गमरे यांना कारागृहात असताना अस्थमाचा (दम्याचा) त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने, ११ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता पोलीस पथकाच्या सुरक्षेत त्यांना रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मेडिसीन विभागाच्या कक्षेत त्यांच्यावर सविस्तर वैद्यकीय उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान प्रकृती अधिक खालावल्याने २५ ऑगस्ट रोजी रात्री ८:४२ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे यांनी घोषित केले. या प्रकरणी प्रशासकीय व कायदेशीर नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.