मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाला सशर्त जामीन मंजूर
रत्नागिरी:- एका गंभीर गुन्ह्यात १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांमधील त्रुटी अन् संशयास्पद बाबींची दखल घेत न्यायालयाने आरोपीची १० वर्षांची मूळ शिक्षा स्थगित करत त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. ऋषिकेश दगडू -. तळेकर असे जामीन मिळालेल्या अर्जदाराचे नाव आहे.
तळेकर याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या. प्रकरणात विचारणा झाल्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, अपील प्रलंबित असेपर्यंत आपली शिक्षा स्थगित करून जामिनावर सुटका करावी, अशी
याचिका त्याने उच्च न्यायालयात होती. केली सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध करत हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे सांगून जामीन नाकारण्याची मागणी केली.
आरोपीने आधीच १८ महिन्यांचा कारावास भोगला आहे आणि अंतिम अपिलाच्या सुनावणीस दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, आरोपीची पार्श्वभूमी आणि वर्तणूक लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.
जामिनावर असताना आरोपीने तक्रारदार किंवा साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, दर तीन महिन्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि आपले ओळखपत्र व पत्ता पोलिसांकडे जमा करावा, अशा कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचा भंग केल्यास जामीन रद्द केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.









