Saturday, July 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पणदेरी मराठवाडी येथे बंद घर फोडून ३७ हजारांचा ऐवज चोरीस

पणदेरी मराठवाडी येथे बंद घर फोडून ३७ हजारांचा ऐवज चोरीस

दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील पणदेरी मराठवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा व लोखंडी कपाट फोडून रोख रक्कमेसह सोन्या-मोत्याची नथ असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ दिनांक १६ जुलै रोजी सकाळी १०:४५ वाजल्यापासून दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या मुदतीत ही चोरी घडली असून, यासंदर्भातील फिर्याद दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ५:४४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आली.

​फिर्यादी सौ. सुजाता भैकरे यांच्या मालकीच्या बंद घराचा मागचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट हत्याराने फोडून आतील तिजोरी उघडली व त्यातून रोख रक्कम आणि मोत्याची नथ फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीने चोरून नेली.