Saturday, September 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी मुरुगवाडा येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

मुरुगवाडा येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुनिता रमाकांत पारकर (वय ७०, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुनिता पारकर हिच्या ह्दयाला होल होतो. तिच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.