Saturday, June 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चोरट्यांनी नाचणे परिसर केला टार्गेट; नारायणमळीत घरफोडी

चोरट्यांनी नाचणे परिसर केला टार्गेट; नारायणमळीत घरफोडी

रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील अन्य एक बंद घर फोडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. बुधवारी नाचणे सावंतनगर येथील बंद घर फोडून सव्वा चार लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गुरुवारी (ता. ११) नाचणे ते नारायणमळी जाणाऱ्या रस्त्‍यावरील एक बंद घर चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घरातील सर्व सदस्य काही कामानिमित कोल्हापूरला गेले होते. गुरुवारी ते रत्‍नागिरीत परतले असता त्‍यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्‍यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. घरफोडीच्या दोन्ही घटना नाचणे परिसरात घडल्यामुळे चोऱ्यांनी सध्या हाच परिसर टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.