रत्नागिरी:- बेदरकारपणे रिक्षा चालवून पादचारी मुलाला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 5 जून रोजी दुपारी 1 वा.सुमारास गयाळवाडी फाट्यावर घडली.
या अपघातात हरेश महेश खेत्री (10, रा.कारवांचीवाडी नॅनोसिटी,रत्नागिरी) हा मुलगा जखमी झाला आहे. याबाबत त्याची आई कावेरी महेश खेत्री हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ती मुलगा हरेश सोबत भाजी आणण्यासाठी गयाळवाडी फाटा येथे गेली होती. भाजी घेउन ती मुलासह घरी परतत असताना रत्नागिरी दिशेकडून येणारी रिक्षा (एमएच-08-एक्यू-2464) वरील अज्ञात चालकाने रिक्षा भरधाव वेगाने गयाळवाडी दिशेने आत वळवली. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना या भरधाव रिक्षेची धडक हरेशला बसून हा अपघात झाला. यात हरेशच्या डोक्याला,तोंडाला व डाव्या पायाला मुक्कामार जखम झालेली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









