दापोली बुरोंडी येथील घटना; जीवे मारण्याचीही धमकी
दापोली:- तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आत्याला आंबे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार महिला ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त असतानाही त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांना ढकलून देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना एकनाथ काजारी (वय ७२) आणि आरोपी केतन कमळाकर केळसकर (वय ३२) हे दोघे नात्याने आत्या-भाचा असून एकमेकांच्या शेजारीच राहतात. ४ मे रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास आंबे देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी केतन याला आपली आत्या वृद्ध आहे आणि त्यांना ब्रेन ट्यूमरचा गंभीर आजार आहे याची कल्पना होती. तरीही त्याने त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांना निष्काळजीपणाने ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ करत हाताच्या थापटाने त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि तोंडावर जबर मारहाण केली. यात कल्पना काजारी या जखमी झाल्या आहेत.
मारहाण सुरू असताना कल्पना यांची मुलगी पूजा चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपीने तक्रारदार आणि त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
याप्रकरणी कल्पना काजारी यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी केतन केळसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.









