Thursday, August 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक

शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक

दापोली पोलिसांची धडक कारवाई

दापोली:- शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या एका ३२ वर्षीय संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने अटक केली आहे. दिपेश दिलीप तांबे (रा. भाटघर, ता. दापोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​दिनांक ३१ जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (भारतीय न्याय संहिता) कलम ७५ आणि पोक्सो अधिनियम ८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळकरी मुली बसमधून प्रवास करत असताना संशयित आरोपी दिपेश तांबे याने त्यांचा पाठलाग करून विनयभंग केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

​​पोलीस तपासादरम्यान संशयित आरोपी हा मजुरीच्या निमित्ताने खेड-चिपळूण परिसरात राहत असल्याची आणि फार कमी वास्तव्य करत असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खेड-चिपळूण परिसरात कसून शोध घेतला. अखेर स्थानिक माहिती आणि गोपनीय पथकाच्या साहाय्याने दिनांक ११ ऑगस्ट रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. ​सदर धडक कारवाई दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि त्यांच्या पथकाद्वारे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.