Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सायन-सापुचेतळे प्रवासादरम्यान प्रवाशाची १ लाख ४२ हजारांची बॅग चोरीला

सायन-सापुचेतळे प्रवासादरम्यान प्रवाशाची १ लाख ४२ हजारांची बॅग चोरीला

रत्नागिरी:- मुंबई- सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅंग अज्ञात चोरट्याने पळविली. या बागेत १ लाख ४२ हजार ७४८ रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. अज्ञात चोरट्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता.२७) सकाळी साडेनऊ ते मंगळवारी (ता.२८) सकाळी पावणे सात या कालवधीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रांत नंदकुमार साळुंके (वय ४४, रा. देवरुख आंगवली. ता. संगमेश्वर. सध्या रा. सुर्या सागर अपार्टमेंट बी विंग, दत्त चौक, बदलापूर वेस्ट) हे सायन वरुन सापुचेतळे स्टॉप असा खासगी ट्रव्हल्सची कुलस्वामीनी गाडी (क्र. एमएच-०३ सी व्ही. ७७००) तून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅंग पळविली. त्यामध्ये १ लाख ४० हजार ७४७ रुपये किमतीचे ७ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ हजार असा १ लाख ४२ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी विक्रांत साळुंके यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.