Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे फ्री पार्किंग येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ मार्च ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत रेल्वेस्टेशनजवळील फ्री पार्किंग च्या बाजूला मोकळ्या जागेत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अमरदी पसिंग सतनाम सोखी (वय २३, रा. भोके, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएल २५०७) ही रेल्वेस्टेशन जवळील फ्री पार्किंगच्या बाजूला पार्क करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी अमरदी सोखी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.