Monday, July 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी तरवळ मायंगडेवाडी येथे भरदिवसा दोन घरे फोडली

तरवळ मायंगडेवाडी येथे भरदिवसा दोन घरे फोडली

कारवांचीवाडी फाटा येथील तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथे दोन घरातमध्ये घरफोडी झाली. या दोन घरातील चोरट्याने ३८ हजाराची रोख रक्कम पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. आदित्य देवचंद्र कांबळे (वय २६, रा. बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या  घटना रविवारी (ता. ५) दुपारी साडेतीन च्या सुमारास तरवळ मायंगडेवाडी येथे घडल्या.  

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विरेश प्रकाश मायंगडे (वय २९) व प्रज्योत रविंद्र मायंगडे (वय २३, दोघेही  रा. तरवळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) यांची घरे आहेत. रविवारी दुपारी चोरट्याने या दोन्ही घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. घरातील लोखडी कपाटाचे ड्राव्हरमधील ३३ हजाराची रोख रक्कम काढून पळून जात असताना फिर्यादी यांनी सर्वेश संदेश मायंगडे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की करुन पलायन केले. तर फिर्यादी प्रज्योत मायंगडे यांच्या घरातून मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन घरातील उघड्या कपाटात छोट्या पाकिटात ठेवलेले ५ हजार रुपये पळविले. असा ३८ हजाराच्या रोख रक्कमेवर चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी फिर्यादी  विरेश मायंगडे व प्रज्योत मायंगडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.