Wednesday, June 10, 2026
spot_img
Home दापोली पंदेरी येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

पंदेरी येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर प्राणज्योत मालवली

दापोली:- तालुक्यातील पंदेरी (पो. उंबरघर) येथील रहिवासी प्रविण यशवंत घरवे (वय ४६) यांचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आल्यानंतर त्यांच्यावर दापोली आणि त्यानंतर मुंबईत उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास प्रविण घरवे यांना राहत्या घरी अचानक अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना तातडीने दापोली येथील भागवत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले.

जे.जे. रुग्णालयात प्रविण घरवे यांच्यावर ‘ब्रेन हॅमरेज’ (मेंदूतील रक्तस्त्राव) झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू असतानाच कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी मयताच्या पत्नी सौ. पल्लवी प्रविण घरवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दप्तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रविण हे व्यवसायाने मजूर होते. त्यांच्या पश्चात पत्नी व कुटुंब असा परिवार आहे. पंदेरी परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.