Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी गयाळवाडी फाटा येथे डंपरची चारचाकीला धडक; तीन महिला जखमी

गयाळवाडी फाटा येथे डंपरची चारचाकीला धडक; तीन महिला जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी फाटा येथे डंपरने चारचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीतील तीन महिला जखमी झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास खेडशी-गयाळवाडी फाटा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपर (क्र. एमएच-०८ बीके ४९७७) वरिल डंपर चालकाने मुख्यरस्त्यावरुन भरधाव वेगाने जाताना अचानक डंपर वळविल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये स्वरांगी सुरेश पवार (वय ४५), मंजिरी मकरंद परकर (३०, ) व सरोजनी दाजी पवार (६८, रा आरवली, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) या तिन महिला जखमी झाल्या. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक श्री. टेमकर, राजेंद्र सावंत हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा केला. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सायंकाळी उशिरापर्यत सुरु होती.