रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अब्बास कागवाड (रा. आशियाना अपार्टमेंट, मारुती मंदिर, रत्नागिरी) व रशिदमियॉ कमालुद्दीन मणचेकर (रा. उद्यमनगर, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास थिबापॅलेस रस्त्यावरिल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीजवळ निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महाविद्यालयाच्या पाठीमागील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार दिपक साळवी व पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









