पावस:- तालुक्यातील नाखरे-मुंगणेकरवाडी येथील प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुर्यकांत विनायक मुंगणेकर (वय ५७, रा. नाखरे-मुंगणेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुर्यकांत यांना मद्यपान करण्याची सवय होती रात्री उशीरा झोपून सकाळी उशिरा उठत असत. सकाळी सुर्यकांत हे बेशुद्ध अवस्थेत आढळले तात्काळ त्यांना उपचारासाठी पावस येथील खासगी दवाखान्यात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरु असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.









