Friday, May 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी शीळ येथे कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

शीळ येथे कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-शीळ-करबुडे मार्गावर शीळ येथे बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रत्नागिरीहून करबुडेच्या दिशेने जाणारी कार आणि करबुडेहून रत्नागिरीकडे येणारी बुलेट दुचाकी शीळ येथील उतारावर समोरासमोर धडकली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला असून तो गंभीर जखमी झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.