Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी शेकोटी घेताना चांदेराई येथील महिला भाजली

शेकोटी घेताना चांदेराई येथील महिला भाजली

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे महिला शेकोटी घेत असताना ४५ टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सेजल संतोष सुर्वे (वय ४२, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेजल या सकाळी शकोटी घेत असताना त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यामध्ये त्या ४५ टक्के भाजल्या नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.