Thursday, June 11, 2026
spot_img
Home राजकीय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदार यादी प्रसिद्ध होणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदार यादी प्रसिद्ध होणार

14 ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्याचा कालावधी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर 8 ऑक्टोबर ते दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती किंवा सूचना संबंधित निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. 14 ऑक्टोबर नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

सन 2025 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील 23 सप्टेंबर 2025 च्या पत्रानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसीलदार मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर, पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर,संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

या प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर मतदारांना व नागरिकांना दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 पर्यत हरकती किंवा सूचना संबंधित निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येतील. दिनांक 14 ऑक्टॉबर2025 नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत.