Tuesday, October 27, 2026
spot_img
Home राजकीय निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून मतांची चोरी

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून मतांची चोरी

काँग्रेस निरिक्षक सौम्या रेड्डी यांचा आरोप

रत्नागिरी:- धर्माचे आणि जाती पातीचे राजकारण करुन निवडणुका आता आपल्याला जिंकता येणार नाहीत हे भाजपाच्या लक्षात आले आह़े. महाराष्ट्र,पश्चिम बंगाल या निवडणुकांमध्ये आपल्याला कशा प्रकारे मतचोरी केली हे पहायाला मिळाले आह़े. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा मतचोरीचा प्रयत्न करत आह़े. देशात लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत 1 नोव्हेंबरला जोरदार आंदोलन हाणार आह़े. अशी माहिती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा निरिक्षक व कर्नाटकच्या माजी आमदार सौम्या रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी.
  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत 1 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आह़े. या पार्श्वभूमिवर सौम्या रेड्डी या रत्नागिरी जिल्हा दौऱयावर आल्या असता शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधल़ा. यावेळी राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानु खलिफे, काँग्रेस उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, काँग्रेस दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे व काँग्रेसच जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होत़े.
  सौम्या रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मतदान हा सर्वांचाच अधिकार आह़े. निवडणुका या पारदर्शक पद्धतीने झाल्या तरच लोकशाही टिकून राहिल़ मात्र सध्याचे सरकार निवडणुकांमध्ये मतचोरी करत आह़े. त्यासाठी त्यांनी मुख्य निवडणुक आयुक्त यांना कायदा करुन संरक्षण दिल़े. पुर्वी मुख्य निवडणुक आयुक्त निवडताना सवौच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेते व पंतप्रधन यांचा समावेश होत़ा. मात्र सरकारने कायदा करुन सवौच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना बाजुला करुन एका मंत्र्याची निवड केल़ी त्यामुळे सरकार निवडणुक विभागाच्या कारभारात दखल देत असल्याचे दिसून येत आह़े.
  महाराष्ट्राच्या निवडणुकीत 39 लाख मतांचा घोळ करण्यात आल़ा. सध्या एसआयआरच्या माध्यमातून दलित व आदिवासी यांची मते कमी करण्याचा घाट घातला जात आह़े. लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केल़ा. 1 नोव्हेंबरला आंदोलन होणार असले तरी सर्वत्र जिल्हा व तालुका स्तरावर देखील वोटचारी संदर्भात आंदोलन करण्यात येईल असे रेड्डी यांनी सांगितल़े.