Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कुवारबावसह मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या तीन तरुणाविरुद्ध गुन्हा

कुवारबावसह मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या तीन तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ व मांडवी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल मुनाफ अब्दूल हमीद मजगावकर (वय ३७, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), शुभम प्रकाश सावंत (वय २८, रा. आंबेशेत, रत्नागिरी) आणि सिद्धेश पद्माकर बने (वय २७, रा. निरळ रिंगीचीवाडी, रत्नागिरी) अशी संशयिअत तिन तरुणांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाच व दुपारी साडेबारा ते सव्वाच्या सुमारास कुवारबाव बाजारपेठ व मांडवी बीच येथे निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण मद्यपानाचा परवाना नसताना कुवारबाव बाजारपेठ व मांडवी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी व पोलिस हवालदार आशिष भालेकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल भालचंद्र मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.