निवेंडी येथे घरफोडी; ३ लाख ५१ हजारांच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे घरफोडी करुन चोरट्याने ३ लाख ५१ हजार ९६० रुपयांची सोन्या चांदीचे दागिने पळविले. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते बुधवारी (ता. १३) ऑगस्ट रात्री अकराच्या सुमारास निदर्शनास आली.

   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुणा पर्शुराम घाग (वय ६२, रा. भगवतीनगर, निवेंडी, रत्नागिरी) यांच्या उघड्या घरामध्ये चोरट्याने प्रवेश करुन घराच्या आतील खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले ३ लाख ५१ हजार ९६० रुपयांचा दागिने चोरट्याने पळविले. या प्रकरणी अरुणा घाग यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.