Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी कापडगाव येथे खांब कोसळून वायरमन जखमी

कापडगाव येथे खांब कोसळून वायरमन जखमी

रविवारी:- आज सकाळी कापडगाव येथे विद्युत खांबावर वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना उभा लोखंडी खांब अचानक खाली कोसळल्याने त्यावर काम करीत असलेला वायरमन खाली कोसळून जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,आज सकाळी ११.०० वाजण्याच्या दरम्यान कापडगाव सुतारवाडी येथे विद्युत खांबावर चढून वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना चढलेला उभा असलेला लोखंडी खांब अचानक खाली कोसळल्याने त्यावर काम करीत असलेला वायरमन सुचित सुरेश घाणेकर(सध्या नेमणूक कापडगाव मूळ रा.खानू) हा जोराने जमिनीवर आपटून जखमी झाला. तातडीने त्याला उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात आणून प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे.